नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालक्यातील ईवळेश्र्वर येथील शेतीच्या वादातून दोन गटात राडा झाला यामध्ये हरीओम जाधव(60) याला जबर मारहाण झाली होती. उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दि.3 जानेवारी 2024 रोजी त्याचा मृत्यू झाला. माहुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास हरीओम जाधव आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या अर्जुन राठोड या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचला होता. यात अर्जुन गेमसिंह राठोड, रोहिदास गेमसिंह राठोड, गेमसिंह मेहराम राठोड आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक या चौघांनी मिळून हरीओम गोपाळ जाधव यांना काठी, लोखंडी रॉड, आणि धार धार असणाऱ्या चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जखमी अवस्थेतच हरीओम जाधव यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतांना दि.3 जानेवारी 2024 रोजी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत हरीओम जाधव यांची पत्नी अनीबाई हरीओम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन माहूर पोलीस ठाण्यात कलम 302, 307, 326, 34 भादवि प्रमाणे गुन्हा क्रमांक 01/2024 दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी अर्जुन गेमसिंह राठोड, रोहिदास गेमसिंह राठोड, गेमसिंह मेहराम राठोड आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक या चौघांनाही माहूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय पवार हे करीत आहेत.
शेतीच्या वादातून माहुर तालुक्यात एकाचा खून