सागर यादव प्रकरणात आज दोन आरोपी पोलीस कोठडीत; एकूण आरोपींची संख्या 35

नांदेड(प्रतिनिधी)-सागर यादव खून प्रकरणातील 34 आणि 35 क्रमांकाचा आरोपी पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी या दोघांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.6 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास सराफा भागात शेकडो लोकांसमोर एका जमावाने सागर यादव आणि त्याचा भाऊ मोनु यादव या दोघांवर अनेक तलवारी घेवून हल्ला केला. त्यात सागर यादवचा मृत्यू झाला आणि मोनु यादव गंभीर जमखी झाला. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात इतवारा पोलीसांनी आजच्या अगोदरपर्यंत 33 आरोपींना अटक केले होते. त्यातील 4 जण 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. इतर न्यायालयीन कोठडीत आहेत. काल इतवारा पोलीसांनी या प्रकरणातील 34 आणि 35 क्रमांकाचे आरोपी पकडले. त्यांची नावे परमेश्र्वर यादव कौठेकर (29) रा.शिवनगर हिंगोली नाका नांदेड, शुभम शिवाजीराव देवराव (23) रा.विठ्ठलनगर वळणरस्ता नांदेड. आज पोलीस निरिक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन हाके, नजरे आझम देशमुख, संघरत्न गायकवाड, दिलीप राठोड आदींनी काल पकडलेल्या कौठेकर आणि देवरायला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांना 9 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *