नांदेड (प्रतिनिधी)– ओबीसी आरक्षणावर होणारे अतिक्रमण थांबवण्याच्या मागणीसाठी ओबीसीचे दिग्गज नेते रविवारी नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे येणार आहेत.यात मंत्री छगन भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे ऍड.प्रकाश आंबेडकर,प्रकाशअण्णा शेंडगे ,माजी मंत्री महादेव जानकर ,आ.विनय कोरे ,आ.गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते या महामेळाव्याला रविवारी सकाळी साडे आकरा वाजता संबोधीत करणार आहेत.
नायगांव तालुक्यातील नरसी येथील साठ एकर जागेवर या मेळाव्याची पुर्ण तयारी करण्यात आली आहे.हा महामेळावा एैतिहासीक ठरवण्यासाठी सकल ओबीसी बांधवांनी तयारी पुर्ण केली आहे. या मेळाव्यासाठी नांदेड ,लातूर,परभणी,हिंगोली आदीसह अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत.ओबीसी महामेळाव्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.या महामेळाव्याला येणाऱ्या वाहनांच्या वहानतळाची व्यवस्था जागोजागी करण्यात आली आहे.याच बरोबर येणाऱ्या समाज बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी पिण्याचे पाणी तसेच नाष्टा आदी व्यवस्था सकल ओबीसी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.या मेळाव्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या ओबीसी महामेळाव्याला प्रथमच ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे संबोधित करणार आहेत. ते या मेळाव्यात काय बोलतात या कडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष असणार आहे.या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात तालुका,जिल्हा परिषद गट व गावपातळीवर बैठका घेऊन महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे ऍड.अविनाश भोसीकर,महेंद्र देमगुंडे यांनी केले आहे.