नांदेड(प्रतिनिधी)-कंधार येथील एका पोलीस अंमलदाराने आपल्या पोटाच्या आजाराला कंटाळून 5 जानेवारी रोजी रात्री आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
कंधार येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार हनमंत तुकाराम केंद्रे (53) हे काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त्र होते. अनेक जागी उपचार केल्यानंतर सुध्दा आजार बरा होत नव्हता. तेंव्हा त्यांनी काल रात्री आपल्या घराच्या शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत कंधार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती. हनमंत केंद्रे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटूंबासह गावात शोककळा पसरली आहे.केंद्रीय कुटूंबियांच्या दु:खात वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा सहभागी आहे.
पोलीस अंमलदाराची आत्महत्या