नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली गेटच्या शेजारी असलेल्या घोडदौड मैदानावर एका 26 वर्षीय युवकाचा खून करून त्याचे डोके धडावेगळे करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
आकाश यशवंत राऊत रा. उमरखेड जि.यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा छोटाभाऊ विकास यशवंत राऊत (26) यास कोणी तरी काही तरी अज्ञात कारणासाठी 5 जानेवारी ते 6 जानेवारीची पहाट होई दरम्यान धार-धार शस्त्राने खून करून त्याचे डोके शरीरापासून वेगळे केले आहे. वजिराबाद पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे अधिक तपास करीत आहेत.
शिर धडावेगळे करून खून