नांदेड ( )- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे बुधवार दिनांक १० जानेवारी ते ११ जानेवारी या दोन दिवसात कुसुम सभागृह येथे सकळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न होणार आहे. या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण ११ संघांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता केंब्रीज माध्यमिक विद्यालय, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, वैभव देशमुख दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना”, दुपारी ०१:१५ मिनिटांनी बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “काहीतरी चुकतंय वाटतय”, दुपारी ०२:३० मिनिटांनी ज्ञानभारती विद्यामंदिर, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, राहुल जोंधळे दिग्दर्शित “बुद्धाची गोष्ट”, दुपारी ३:४५ मिनिटांनी जिंतूर शिक्षण संस्था संचलित डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर, जिंतूरच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, नागेश कुलकर्णी दिग्दर्शित “मदर्स डे” दुपारी ५:०० वाजता नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरणी च्या वतीने “जड झाले ओझे” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे तर स्पर्धेच्या दुसर्या दिवशी दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, स्वाती घाणेकर दिग्दर्शित “एलियन्स द ग्रेट”, दुपारी १२:०० वाजता राजाराम काकानी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविध्यालय, धर्माबादच्या वतीने नाथा चितळे लिखित श्रीनिवास दर्शन दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना”, दुपारी ०१:१५ मिनिटांनी शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नंदेच्या वतीने असिफ अन्सारी लिखित, महेश घुंगरे दिग्दर्शित “वडाळा ब्रिज”, दुपारी २:३० मिनिटांनी टायनी एंजल्स स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित,गौतम गायकवाड दिग्दर्शित “करामती पोर”, दुपारी ३:४५ मिनिटांनी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित उपेंद्र दुधगावकर दिग्दर्शित “जगण्याचा खो” आणि दुपारी ०५:०० वाजता जिल्ह्य परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, फुलकळस, परभणीच्या वतीने गोविंद गोडबोले लिखित डॉ. सिद्धार्थ मस्के दिग्दर्शित “गोष्टीची गोष्ट” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार असल्याचे नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी कळवले आहे.
या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून बाल कलावंताना प्रोत्साहन द्यावे असे आव्हान विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.