नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा सचखंड श्री हजुर साहिब ते नगीनाघाट गुरूद्वारा साहिब या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश झाल्यानंतर सुध्दा ते अतिक्रमण काढण्यात आले नाही म्हणून त्या बाबत न्यायालयाचा अवमान याचिका दाखल झाली. त्या अवमान याचिकेचा क्रमांक 151/2020 आहे. मुळ याचिकेचा क्रमांक जनहित याचिका क्रमांक 114/2018 असा आहे. यामध्ये 18 जानेवारी 2024 ला पुढील सुनावणी सुनिश्चित करण्यात आली आहे.
नांदेड येथील सरदार जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा श्री सचखंड हजुर साहिब ते गुरुद्वारा नगीनाघाट साहिब या रस्त्यावर असलेले अतिक्रमण त्रासदायक आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास होतो. म्हणून ते अतिक्रमण काढण्यात यावे अशी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्या मुळ याचिका क्रमांक 114/2018 मध्ये उच्च न्यायालयाने रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश महानगरपालिका नांदेडला दिले होते. त्यानंतर एकदा हे अतिक्रमण काढण्यात पण आले. परंतू काही दिवसात पुन्हा ते अतिक्रमण जशास तसे तयार झाले. यामुळे न्यायालयात अवमान याचिका क्रमांक 151/2020 दाखल करून न्यायालयाचा अवमान झाल्याबद्दल तक्रार करण्यात आली. त्यात उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मंगेश पाटील आणि शैलेश ब्रम्हे यांनी दि.4 जानेवारी 2024 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्तांना या प्रकरणात अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या अवमान याचिकेतची पुढील सुनावणीसाठी मनपा आयुक्तानंी 18 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नांदेड महानगरपालिका आयुक्त हाजीर हो…; उच्च न्यायालयाचा आदेश