नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील 167 पोलीस निरिक्षक ते पोलीस उपनिरिक्षक या पदाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या नांदेड परिक्षेत्रातील इतर तिन जिल्ह्यांची नावे देण्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोाकटे यांनी 7 जानेवारी 2024 जारी केले आहेत. यात लोखंडी पुरूषाचा पण समावेश आहे.
निवडणुक आयोगाने येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पोलीस अधिक्षक कार्यालयाने 167 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्या बदल्या करायच्या आहेत. या यादीमध्ये 9 पोलीस निरिक्षक स्वग्राम असलेले आहेत, 9 पोलीस निरिक्षक नांदेड जिल्ह्यात 3 वर्ष पुर्ण करणारे आहेत. 24 सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वग्राम असणारे आहेत. 23 सहाय्यक पोलीस निरिक्षक नांदेड जिल्ह्यात 3 वर्ष पुर्ण करणारे आहेत. पोलीस उपनिरिक्षकांमध्ये 79 पोलीस उपनिरिक्षक नांदेड स्वग्राम असलेले आहेत तर 23 पोलीस उउपनिरिक्षक नांदेड जिल्ह्यात 3 वर्ष पुर्ण झालेले आहेत असे हे एकूण 167 अधिकारी आहेत.
नांदेड जिल्हा स्वग्राम असणारे पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे जगदीश राजन्ना भंडरवार, अशोक ययातीराव घोरबांड, साहेबराव लक्ष्मणराव गुट्टे, सुर्यमोहन नारायणराव बोलमवाड, संजय भिमाशंकर हिबारे, सुभाष पांडूरंग उन्हाळे, उदय अशोकराव खंडेराय, श्रीमती वसुंधरा विठ्ठलराव बोरगावकर, गणेश माणिकराव सोंडारे. नांदेड जिल्ह्यात आपला कार्यकाळ 3 वर्ष पुर्ण करणारे दत्तात्रय शिवाजीराव निकम, विलास विश्र्वंभरराव गोबाडे, नामदेव लिंबाजी रिठ्ठे, नारायण दुर्गादास सावणे, मोहन बाळासाहेब भोसले, बिरप्पा धोंडीबा भुसनूर, दिपक अंबादास बोरसे, संतोष बापूराव तांबे, डॉ.नितीन भास्करराव काशीकर असे आहेत. यामध्ये जगदीश भंडरवार, उदय खंडेराय, वसुंधरा बोरगावकर, सुभाष उन्हाळे हे अगोदरच अकार्यकारी शाखेत कार्यरत आहेत.या अकार्यकारी शाखेमध्ये स्थानिक गुन्हे शाखा सुध्दा सर्वात छान अकार्यकारी शाखा आहे. तसेच नामदेव रिठ्ठे, नारायण सावणे हे सुध्दा अकार्यकारी शाखेत कार्यरत आहेत.त्यामुळे यांच्या बदल्या होणार नाहीत असे वाटते. नांदेड जिल्ह्यात 3 वर्ष पुर्ण करणारे 9 पोलीस निरिक्षक आहेत. त्यांना बहुतेक पोलीस ठाणे बदलून देण्यात येतील.
स्वग्राम असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक 24 आहेत. तसेच स्वग्राम असलेले पोलीस उपनिरिक्षक 79 आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात 3 वर्ष सेवा पुर्ण केले सहाय्यक पोलीस निरिक्षक 23 आहेत तर नांदेड जिल्ह्यात आपली सेवा पुर्ण करणारे पोलीस उपनिरिक्षक 23 आहेत. आता कोण-कोण कसे-कसे आपल्याला वाचवतो हे पाहण्यासारखे असेल.
वाचकांच्या सोयीसाठी जारी झालेली 167 अधिकाऱ्यांची यादी बातमीसोबत पीडीएफ स्वरुपात जोडली आहे.
निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार नांदेडमध्ये 167 पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्तीचा शोध ; कोणाच्या नशीबात काय?