नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पथकाने कॅनॉल रोड आणि सुर्योदयनगर येथे चोरी करणारे दोन चोरटे पकडले आहेत. त्यंाच्याकडून 5 लाख 49 हजार 130 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील कॅनॉल रोड आणि सुर्योदयनगर येथे झालेल्या चोऱ्यांबद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळालेली माहिती त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांना दिली. पांडूरंग माने यांनी आपले पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना सांगून मनुष्यबळ उपलब्ध करून घेतला आणि त्यानुसार त्यांनी मेहनत करून शेख आदील शेख चॉंद (22) रा.सना कॉलनी यास ताब्या घेवून विचारपुस केली तेंव्हा त्याने सांगितले की, त्याचे दोन साथीदार सय्यद जौम सय्यद अहेमद अली रा.लेबर कॉलनी व शारेखखान रा.आसरानगर अशा तिघांनी मिळून या चोऱ्या केल्या आहेत. त्याने एकूण 92 ग्रॅम सोन्याचे दागिणे व 980 ग्रॅम चॉंदीचे दागिणे आणि मोबाईल असा 4 लाख 53 हजार 130 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल काढून दिला आहे. तसेच सय्यद जैम सय्यद अहेमद अली रा.लेबर कॉलनी यास ताब्यात घेवून त्याच्याकडून चोरीचे 35 हजार रुपये व गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी गाडी व मोबाईल असा 96 हजारांचा मुद्देमाल दोन आरोपींकडून जप्त केला आहे. 5 लाख 49 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल आणि दोन आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 429/2023 च्या तपासासाठी त्यांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करणारे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, मोतीराम पवार, मारोती मोरे, महेश बडगु, गजानन बैनवाड, राजू सिटीकर, दिपक आढणे, गंगाधर घुगे यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरीच्या घटना उघकीस आणल्या; 5 लाखांपेक्षा जास्त चोरीचा मुद्देमाल जप्त