नांदेड(प्रतिनिधी)-माळेगाव यात्रेच्या पत्रिकेवरून माळेगावचा मालकच गायब झाला आहे. अशा प्रकारची नाविन्यपुर्ण पत्रिका जिल्हा परिषद नांदेडने तयार केली आहे. ही पत्रिका यशश्री क्रियेशनने बनवलेली आहे.
माळेगावचा मालक आमचा देव खंडोबा आहे. आजपर्यंतच्या माळेगाव यात्रेच्या प्रत्येक पत्रिकेवर माळेगावच्या मालकाची फोटो नेहमीच असायची. पण यंदाची पत्रिका तशी बनवली छान आहे. प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे कार्यक्रम यात नमुद करून त्या बाजूला तशी चित्रे प्रदर्शीत केली आहेत. परंतू आमच्या माळेगावच्या मालकाचाच फोटो देवस्वारी पुजनाच्या बाजूला वेगळ्याच स्वरुपात आहे. कारण आमच्या मालकाची देवस्वारी पालखीत निघते आणि तोच फोटो पहिल्या पानावर सुध्दा छापण्यात आला आहे.
दक्षीण भारतामध्ये माळेगावच्या यात्रेला देशभर महत्व आहे. या यात्रेच्या तयारीची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच करत आले आहे. प्रत्येकवेळी या यात्रेच्या कार्यक्रमाची पत्रिका छापली गेली जाते. त्यात कधी नाव न छापल्याचे गोंधळ झाले आहे. तर कधी पत्रिका पोहचली नाही असे गोंधळ झाले आहे. परंतू यंदा या पत्रिकेवरून माळेगावचा मालक खंडोबाच गायब झाला आहे. प्रशासनाच्यावतीने या यात्रेसाठी 82 लाख रुपयांचे नियोजन केले आहे. खंडोबाच्या आर्शिवादाने या 82 लाखाचा भंडारा कोठे-कोठे उधळला जाणार हे काही न कळतेच आहे. सध्या परिस्थितीत प्रशासकीय राज्य जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्या कोणत्याही शब्दाला काही एक महत्व नाही. या परिस्थितीमुळे माळेगावचा मालक या पत्रिकेवरून गायब करण्यात आला काय? किंवा गायब झाला कसा हे महत्वपुर्णच आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगावचे मालक खंडोबा यांचे भक्त असणाऱ्या अनेकांनी पत्रिकेवरून मालक गायब झाल्याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली आहे असो. माळेगावचा मालक चुका करणाऱ्यांना क्षमा करील परंतू या चुकीची जबाबदारी त्या व्यक्तीवर निश्चित होणे आवश्यक ज्याने ही पत्रिका तयार करण्याची जबाबदारी पार पाडली आणि या पत्रिकेला पुर्णत्व देण्याचे काम करणारे सुध्दा यासाठी जबाबदार आहेत असो उद्या देवस्वारीची पुजा आहे माळेागावचा मालक खंडोबा आमच्या चुकांना क्षमा करील अशी अपेक्षा लिहिण्यामागे पत्रिका तयार करणारी मंडळी सुध्दा आमचीच आहेत असे आम्ही मानतो.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी माळेगाव यात्रे संदर्भाने पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस सांगितले होते की यंदाची यात्रा नाविन्यपूर्ण करूया. पत्रिकेवरून माळेगावचा मालक गायब करणे यालाच नाविन्यपूर्णता म्हणावे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.