नांदेड (जिमाका),- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळ येथे दुपारी 1.30 वा.आगमन व हेलिकॉप्टरने पोफाळी हेलिपॅड जिल्हा यवतमाळकडे प्रयाण. सायं. 5 वा. नांदेड विमानतळ येथे आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथून हेलिकॉप्टरने आगमन व शासकीय विमानाने त्यांचे मुंबई विमानतळाकडे प्रयाण.