औंढा(प्रतिनिधी)-तहसील कार्यालय औंढासमोर उद्या 11 जानेवारीपासून रिपब्लिकन युवा सेना तांब्या ताट आंदोलन करणार आहेत.
औंढा नागनाथ जि.हिंगोली येथील स्वस्त धान्य दुकानदार चुकीच्या पध्दतीने धान्य वाटप करत आहेत याबद्दलची तक्रार औंढा तहसीलदारांना दिल्यानंतर त्याचा काही एक उपयोग झाला नाही. तसेच शासनाच्या अन्न व पुरवठा विभाग झोपेचे सोंग घेवून बसला आहे. म्हणून रिपब्लिकन युवा सेना औंढा तहसील कार्यालयासमोर ताट-तांब्या आंदोलन करणार आहे असे निवेदन रिपब्लिकन युवासेनेने दिले आहे. या निवेदनावर रिपब्लिकन युवा सेनेचे पंडीत सुर्यतळ, लक्ष्मण खंदारे आणि हितेश किर्तने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उद्यापासून औंढा तहसीलसमोर रिपब्लिकन सेनेचे ताट-तांब्या आंदोलन