2 अल्पवयीन बालकांसह 28 जणांविरुध्द गुन्हा दाखल; 24 जण अटक
नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात 24 जुगारी पकडण्यात आले आणि इतर चार या जुगाराचे चालक आहेत म्हणून 28 जणांविरुध्द जुगार कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणावरून पोलीसांनी 2 लाख 49 हजार 428 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच या घरात तीन तलवारी आणि एक खंजीर सापडल्याने एका व्यक्तीविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदेड शहर येथील वाचक पोलीस उपनिरिक्षक राजेश डाकेवाड यांच्या स्वाक्षरीने दोन प्रसिध्दी पत्रक निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार 8 जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांना मिळालेल्या माहितीनुसार कलामंदिर येथील एक्सीस बॅंकेच्या पाठीमागे संतोष आहिर आणि गोकुळ आहिर यांच्या घरात जुगार अड्डा सुरू आहे. त्या बंदीस्त जागेमध्ये मटका व लॉटरी असे जुगार सुरू होते. सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक राजेश डाकेवाड, पोलीस अंमलदार सुदाम जाकोरे, गजानन कदम, अंकुश लांडगे, गणेश श्रीरामे, अर्चना भोकरे, लक्ष्मण डोपेवाड आदींनी तेथे छापा मारला. या घराचे मालक संतोष बाबुलाल आहिर असे आहेत. तेथे पकडण्यात आलेले जुगार विकास कोंडीबा भवरे (34) रा.शिवशक्तीनगर नांदेड, सिताराम चांदोजी उफाडे (40) रा.गायत्रीनगर, हनमंत चांदोजी उफाडे (35) निजामाबाद, बसवेश्र्वर खुशालराव होनराव(33) रा.सखोजीनगर नांदेड, रामदास दादाराव शिंदे (52) रा.आष्टी ता.हदगाव, साहेबराव संभाजी कल्याणकर (70) रा.शेंबोली ता.मुदखेड, गोविंद मोतीराम खंदारे (46) रा.विष्णुपूरी नांदेड, चंद्रशेखर शिवप्पा देसाई (54) रा.आरमोर, संजय गोविंद क्षीरसागर हे शिक्षक आहेत (56) रा.गणेशनगर नांदेड, संतोष पांडूरंग जटाळे(41) रा.बोधडी ता.किनवट, परसराम बालन तेलंगे (40) रा.कलंबर ता.कंधार, राज नारायण रेड्डी(52) रा.करीमनगर हैद्राबाद, नामदेव शंकरराव जाधव(31) रा.सोनखेड, चंद्रकांत कामाजी धुताडे (35) रा.वडजगाव जि.नांदेड, दादाराव संभाजी शिंदे (73) रा.विष्णुपूरी, सोमेश मदनसिंह बिलडा(30) रा.रविनगर कौठा, गणेश सरदार यादव (26) रा.वजिराबाद नांदेड, राममुर्ती सुब्रम्हण्यम नायर (55) रा.सोमेश कॉलनी नांदेड, दिपक नारायण जाधव (35) रा.देवसरी ता.उमरखेड, शेख सलीम शेख इमाम(38) रा.लिंबगाव नांदेड, किरण ग्यानोजी धाबे (33) रा.नेरली जि.नांदेड, निलेश गोकुळ आहिर, तुलजेश संतोष यादव, राहुल भुसेवाड, कमलकिशोर यादव असे 28 आरोपी आहेत. ज्यामध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत.
हा जुगार चालविणारे निलेश गोकुळ अहिर, तुलजेश संतोष यादव, राहुल भुसेवाड आणि कमलकिशोर यादव हे आहेत. यापैकी 24 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 49 हजार 428 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
जुगार अड्ड्यात सापडल्या तलवारी
या जुगार अड्ड्यावर छापा मारला तेंव्हा पोलीस पथकाने घरमालक गोकुळ बाबुलाल अहिर यांच्या घरातील सर्वच खोल्यांची तपासणी केली असता एका खोलीमध्ये तीन तलवारी आणि एक खंजीर असा 5 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. याबाबत गोकुल बाबुलाल अहिरविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम. आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.