नांदेड(प्रतिनिधी)-लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेस्टाहाऊस जवळ तिन जणांनी पेट्रोल पंपाचे नोकर याच्या हातातील 4 लाख 91 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने लुटून नेली आहे.
नारायण गोविंद नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 जानेवारीच्या रात्री 10 वाजेच्यासुमारास ते भिमाशंकर पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल विक्री करून जमा झालेले 4 लाख 91 हजार रुपये आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डब्ल्यू. 5119 वर बसून पेट्रोल पंपाचे मालक यांना देण्यासाठी राजारामनगर लोहा येथे जात असतांना लोहा विश्रामगृहाजवळ एका दुचाकीवर तिन जण आले. त्या लोकांनी तोंडाला पांढरे रुमाल बांधलेले होते. त्या तिघातील एकाने आवाज दिला परंतू मी गाडी थांबवली नाही. तेंव्हा माझ्या दुचाकीजवळ येवून तिघांपैकी एकाने माझ्या चालत्या दुचाकीला लाथ मारुन मला खाली पाडले. त्या तिघांपैकी एकाने तलवारीचा धाक दाखवून माझ्याकडे असलेली 4 लाख 91 हजार रुपये रोख रक्कमेची बॅग बळजबरीने चोरून नेली आहे. लोहा पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितीच्या कलम 392, 34 सोबत भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 5/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक हासले हे करीत आहेत.
लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 लाख 91 हजारांची लुट