नांदेड(प्रतिनिधी)- येथील जंगमवाडी परिसरातील रहिवासी तथा सायन्स कॉलेजचे सेवानिवृत्त लॅब असिस्टंट सुधीर मोहनराव कोकरे वय ६५ वर्ष यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.ते सायंन्स काॕलेज नांदेड येथे वरिष्ठ लिपीक पदावरुन सेवा निवृत झाले होते.त्यांचा अंत्यविधी दि.१२ रोजी दुपारी १.०० वा.गोवर्धनघाट येथे होणार आहे.
सोमठाणा येथील ज्यु.काॕलेजचे प्रा.संदीप कोकरे आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शिला निखाते यांचे वडील तर डॉ. दिनेश निखाते यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,सुन,जावई, नातवंडे असा परीवार आहे.