नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आज येळआमवस्या संपल्यानंतर प्रतिपदेच्या दिवशी पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस निरिक्षक पदाचा प्रभार स्विकारला आहे. आज 12 जानेवारी आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावरच्या बदल्या आज होणे अपेक्षीत आहे.
नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विमानतळचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळण्यास सांगितल्यानंतर आताच काही वेळापुर्वी नागनाथ आयलाने यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. इतर पोलीस निरिक्षकांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. यापुर्वी बरेच महिने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकांत जगताप यांच्याकडे होता. पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांचे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकांत जगताप आणि इतर अधिकारी आणि अंमलदारांनी स्वागत केले.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नागनाथ आयलाने