नेहरू युवा केंद्राच्यावतीने 13 जानेवारी रोजी भाषण स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका)- नेहरू युवा केंद्राच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त “मेरा भारत विकसित भारत@2047”  या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित केली आहे.  ही स्पर्धा शनिवार 13 जानेवारी 2024 रोजी श्री गुरुगोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी विष्णुपूरी, नांदेड येथे सकाळी 11 वा. घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्हयातील सर्व महाविद्यालयीन युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

युवकांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नेहरू युवा केंद्र, नांदेड कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच मेरा युवा भारत या पोर्टलवर  आपले रजिस्ट्रेशन करावे. यासाठी  नोंदणी https://mybharat.gov.in/yuva_register या लिंकवर करावी. अधिक माहीतीसाठी नेहरू युवा केंद्र कार्यालयाच्या 8956208192 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

ही स्पर्धा जिल्हास्तरावर स्क्रीनिंग करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत आहे. राज्यस्तरावर  प्रथम बक्षिस 1 लाख रुपये तर द्वितीय 50 हजार रुपये आणि तृतीय 25 हजार रुपयाचे 2 बक्षिसे याप्रमाणे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी वय 15 ते 29 (12 जानेवारी 2024 रोजी 15 वर्ष पुर्ण व  29 पेक्षा कमी ) हिन्दी, इंग्रजी,मराठी भाषेत भाषण देता येईल असेही नेहरू युवा केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *