नांदेड(प्रतिनिधी)- एका व्यक्तीला 5 जी मोबाईल कमी पैश्यात देतो म्हणून 15 हजार रुपये घेवून बोगस मोबाईल दिल्याप्रकरणी दोन जणांविरुध्द रामतिर्थ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विकास दिगंबर सोंडारे रा.हिप्परगा माळ ता.बिलोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना एकदा फोन क्रमांक 7823059584 वरून फोन आला आणि माझे बाळ खुप आजारी आहे. माझ्याकडचा 5 जी मोबाईल कमी किंमतीत देतो असे म्हणून 15 हजार रुपये घेवून विकास सोंडारेला बोगस मोबाईल दिल्याप्रकरणी हिरासिंग धनसिंग चव्हाण रा.खांबगाव जि.बुलढाणा आणि नितेश चव्हाण या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 नुसार गुन्हा क्रमांक 11/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक नरवाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बाळ आजारी आहे म्हणून बोगस मोबाईल विक्री