नांदेड(प्रतिनिधी)-एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आपले लग्न दुसरीकडेच जमवल्यानंतर त्या युवतीने आत्महत्या केली. याप्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीला तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करतो असे सांगून दुसरीकडे सोयरीक केली. परंतू त्या मुलीला वारंवार फोन करून त्रास दिला जात होता. काही आरोपींनी तुला खत्म करून टाकतो असे म्हणून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यानंतर हिमायतनगर पोलीसांनी पवन उर्फ राजू सुभाष आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे, सोनु दिलीप आडे अशा चार जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 306,34 नुसार गुन्हा क्रमांक 6/2024 दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरिक्षक जाधव ह्या गुन्ह्याचा तपास करणार आहेत.
युवतीच्या आत्महत्येनंतर चार जणांविरुध्द गुन्हा दाखल