नांदेड(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून दि.14 रोज रविवारी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे आणि खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आ.राजेश पवार, आ.डॉ.तुषार राठोड, रिपाई (आठवले गट) विजय सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे, भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, डॉ.अजित गोपछडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
महायुतीतील कार्यकर्त्यांचा समन्वय राहावा म्हणून हा जिल्हास्तरीय मेळावा घेतला जात आहे. यानंतर प्रत्येक तालुक्यावर त्यानंतर प्रत्येक जि.प.सर्कल आणि यानंतर विभागीय मेळावा घेतला जाणार आहे. राज्यात एकाच दिवशी म्हणजे 14 जानेवारी रोजी राज्यात एकाच दिवशी सर्वच जिल्ह्यात हा मेळावा घेतला जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रविवारी नांदेड येथे जिल्हास्तरीय महायुतीचा कार्यकर्ता मेळावा