10 पोलीस निरिक्षक, 26 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 52 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील 10 पोलीस निरिक्षक बदलले आहेत. तसेच 26 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 52 पोलीस उपनिरिक्षक यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत. नामांकित पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड यांना जिल्हा विशेष शाखेतील सुरक्षा विभाग अशी मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. सर्वात जास्त नियुक्त्या गुरुद्वारा सुरक्षा विभागात करण्यात आल्या आहेत.
शहर वाहतुक शाखा-2 इतवारा येथील पोलीस निरिक्षक साहेबराव लक्ष्मण गुट्टे, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन बाळासाहेब भोसले, डायल 112 चे पोलीस निरिक्षक नारायण दुर्गादास सावणे या तिघांना जीपीयु(गुरुद्वारा सुरक्षा पथक) येथे पाठविले आहे. बिलोलीचे पोलीस निरिक्षक गणेश माणिकराव सोंढारे यांना सी-47 किनवट येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक शामसुंदर मधुकरराव टाक यांना बिलोली पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. शहर वाहतुक शाखा-1 वजिराबादचे पोलीस निरिक्षक सुभाषचंद्र नारायण मारकड यांना पोलीस ठाणे भोकर येथे पाठविण्यात आले आहे. भाग्यनगर येथील पोलीस निरिक्षक सुर्यमोहन नारायणराव बोलमवाड यांना शहर वाहतुक शाखा-1 वजिराबाद येथे नियुक्ती दिली आहे. माहुरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन भास्करराव काशीकर यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती दिली आहे. इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष बापुराव तांबे यांना जिल्हा विशेष शाखेत (डीएसबी) येथे नियुक्ती दिली आहे. सर्वात मोठी जबाबदारी वजिराबादचे पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड यांच्यावर देत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना जिल्हा विशेष शाखेत सुरक्षा विभाग दिला आहे.
यासोबतच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 26 पोलीस निरिक्षकांना त्यांच्या नियुक्त्या बदलून नविन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. राजू सायन्ना मुत्त्येपोड-वजिराबाद(जीपीयु), शिवराज गंगारा जमदडे-वजिराबाद(जीपीयु), शिवसांब ईश्र्वर स्वामी-इतवारा (जीपीयु), दुर्गा बालाजीराव बारसे-विमानतळ सुरक्षा (नियंत्रण कक्ष-पीएचक्यु), किशोर बाबूराव बोधगिरे-मुखेड(नियंत्रण कक्ष-पीएचक्यु), साईप्रसाद नरसिंगराव चन्ना-लोहा(नियंत्रण कक्ष-पीएचक्यु), शिवाजी गंगाधर सिंगनवाड-भाग्यनगर(शहर वाहतुक शाखा-1), आदित्य निवृत्तीराव लोणीकर-कंधार(वजिराबाद), संगमनाथ माधव परगेवार-भाग्यनगर(माहूर), रामदास माणिक केंद्रे-वजिराबाद(लोहा), विनोद लक्ष्मण चव्हाण-भाग्यनगर(मुखेड), महादेव शिवाजी पुरी-नियंत्रण कक्ष(विमानतळ), चंद्रकांत पंडीतराव पवार-लिंबगाव (उस्माननगर), मुंाजी नामदेव दळवे-तामसा(लिंबगाव), गंगाधर नामदेवराव गायकवाड-माहूर(नियंत्रण कक्ष), राजेंद्र भानुदास सरोदे-न्यायालय देखरेख सेल(वजिराबाद), शिवराज राजाराम तुगावे-आर्थिक गुन्हे शाखा(तामसा), शिवप्रकाश प्रभाकर मुळे-उस्माननगर(विमानतळ), पांडूरंग व्यंकट माने-स्थानिक गुन्हे शाखा (सोनखेड), संतोष शंकरराव शेकडे-मनाठा (कुंडलवाडी), रामकृष्ण श्रीहरी पाटील-भाग्यनगर(कुंटूर), श्रीधर भागवतराव जगातप-माहूर (रामतिर्थ), उमाकांत वैजनाथ पुणे-शिवाजीनगर (मनाठा), संकेत वसंतराव दिघे-रामतिर्थ(मरखेल), सचिन तुकाराम गाढवे-नांदेड ग्रामीण(कंधार).
बदललेले पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. विजय लिंगूराम पंतोजी-धर्माबाद(वाचक उपविभाग किनवट), रमेश शंकरराव खाडे-वजिराबाद(नियंत्रण कक्ष), प्रशांत नागोराव जाधव-भाग्यनगर (नियंत्रण कक्ष), बळीराम व्यंकटराव राठोड-अर्धापूर (नियंत्रण कक्ष), घनशाम परशुराम वडजे-रामतिर्थ(वाचक उपविभाग बिलोली), जमा खान अंबिया खान पठाण-मांडवी (सी-47 किनवट), सुरजितसिंघ किशनसिंघ माली-वजिराबाद(नियंत्रण कक्ष), व्यंकट तुकाराम गंगलवाड-कंधार(वाचक उपविभाग कंधार), दिगंबर पांडूरंग पाटील-भोकर(वाचक उपविभाग धर्माबाद), जयश्री विठ्ठल गिरे-वजिराबाद(जीपीयु), माणिक देवराव हंबर्डे-नांदेड ग्रामीण (जीपीयु), दिपक रामचंद्र भोपळे-सिंदखेड(सी-47 किनवट), विनायक नागोराव केंद्रे-नांदेड ग्रामीण(वाचक उपविभाग इतवारा), बालाजी महादु गाजेवार-विमानतळ सुरक्षा (नियंत्रण कक्ष), रवि यादवराव बुरकुले-सोनखेड(महानगरपालिका), विजय पुंडलिकराव पाटील-नांदेड ग्रामीण(वाचक माहुर उपविभाग), नागोराव वसंतराव जाधव-विमानतळ (जीपीयु), जळबाजी एकनाथराव गायकवाड-शिवाजीनगर(जीपीयु), प्रदीप भानुदास दौंड-विमानतळ(वाचक उपविभाग नांदेड शहर), गजानन विजय अन्सापुरे-मुखेड(जीपीयु), सुनिल अशोक भिसे-भाग्यनगर(जीपीयु), संजय तुकाराम गायकवाड-हदगाव(जीपीयु), सुनिल जयराम पल्लेवाड- उस्माननगर(जीपीयु), भारत रमेश जाधव-मुखेड(वाचक उपविभाग देगलूर), गोविंद बालाजीराव जाधव-नांदेड ग्रामीण(जीपीयु), देवानंद शंकर फडेवाल-किनवट(सी-47 किनवट), राजेश नारायण डाकेवार-वाचक शहर उपविभाग (बीडीएस), कपील शंकर बुध्देवार-अर्धापूर (जीपीयु), ज्योती रामराव बळेगावे-बिलोली(जीपीयु), व्यंकट रामचंद्र कुसमे-कुंटूर(शहर वाहतुक शाखा-1), बाबू विश्वनाथ गिते-शिवाजीनगर(जीपीयु), नागनाथ हनमंत गोंडा तुकडे-मनाठा (जीपीयु), संदीप व्यंकटराव भोसले-एटीबी(नियंत्रण कक्ष), बालाजी किशनराव नरवटे-इतवारा(तामसा), संगिता रघुनाथ कदम-हदगाव(नांदेड ग्रामीण), रहिम बशीर चौधरी-सलग्न इतवारा पोलीस ठाणे (नियंत्रण कक्ष), शेख असद शेख चॉंद पाशा-इतवारा(हदगाव), सुभाष ग्यानबाजी वानोळे-बारड(सी-47), गणेश अशोक गोटके-इतवारा (शहर वाहतुक शाखा क्रमांक-2), विश्र्वजित रामचंद्र रोडे-वजिराबाद(लोहा), गोपाळ चंद्रपाल इंद्राळे-कंधार(भाग्यनगर), नागोराव बालाजी पुंडगिर-इतवारा(कंधार), भुषण बाळासाहेब कांबळे-शिवाजीनगर (मनाठा), दामिनी लिंबाजी ननवरे-भाग्यनगर(हदगाव), प्रियंका राजकुमार आघाव-एएचटीयु(विमानतळ), प्रकाश गणपतराव आवडे-नियंत्रण कक्ष(लोहा), बालाजी हौसाजी किरवले-नियंत्रण कक्ष(वजिराबाद), ज्ञानेश्र्वर एकनाथ भोसले-नियंत्रण कक्ष (नांदेड ग्रामीण), तुळशीराम संभाजी गुहाडे-नियंत्रण कक्ष (भाग्यनगर), गोपाळ दिगंबर सुर्यवंशी-धर्माबाद(नियंत्रण कक्ष), पालसिंग भिकासिंग ब्राम्हण-माहुर(नियंत्रण कक्ष), प्रविण मधुकर हालसे-लोहा(नियंत्रण कक्ष).
सध्याच्या परिस्थितीत नांदेड 6 पोलीस ठाण्यांचा प्रभार सहाय्यक पोलीस निरक्षकांकडे देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका होईपर्यंत ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे किंवा विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या यादीतून पोलीस निरिक्षक नांदेडला आले तर नांदेड शहरातील पाच पोलीस ठाणे त्यांच्यासाठी रिकामेच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *