
नांदेड(प्रतिनिधी)-एकता ग्रुप फाऊंडेशनच्यावतीने येत्या प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जवळपास 500 बॉटल्या रक्त जमा होईल असा विश्र्वास एकता ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष तेजासिंग बावरी यांनी व्यक्त केला. जमा झालेले रक्त गरजुंना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती तेजासिंग बावरी यांनी दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाला भारतात मोठे महत्व असून वेगवेगळ्या संघटना या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांना अनुसरून एकता गु्रपने काल एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत येत्या प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी 2024 रोजी रक्त शिबिराचे आयोजन करू या असे ठरले. या रक्तदान शिबिरात जवळपास 500 बॉटल्या रक्त जमा होईल असा विश्र्वास फाऊंडेशनचे अध्यक्ष तेजासिंग बावरी यांनी व्यक्त केला. जमा झालेले रक्त गरजवंतांना मोफत देण्यात येणार असल्याचे तेजासिंग बावरी यांनी सांगितले.
