पत्रकार केरुरकर, शेवडीकरांना तिन लाखांचा दंड कायम ठेवत खर्च देण्याचे आदेश; बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

बिलोरी,(प्रतिनिधी) – देगलूर येथील राजेश चुनाचे प्रसिद्ध व्यापारी व निष्ठावान शेतकरी शेख आयुब यांची वर्तमानपत्रातून बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या साप्ताहिक सार्वभौम जनता चे संपादक विवेक केरुरकर आणि नांदेड येथील दैनिक श्रमिक एकजूट चे संपादक कृष्णा शेवडीकर विरोधात वर्षे 2016 मध्ये बिलोलीच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने तिन लाखांचा दंड ठोठावला होता.त्यावेळी केरुरकर आणि शेवडीकर यांनी न्यायालयाच्या निर्णया विरोधात बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केली.या प्रकरणाचा निकाल दि.3 जानेवारी 2024 रोजी लागला असून, न्यायालयाने प्राथमिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत केरुरकर आणि शेवडीकर यांनी शेख अयुब यांना तिन लाख दंड आणि न्यायालयीन खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेख अयुब यांनी न्यायालयीन लढाई जिंकत केरुरकर आणि शेवडीकर यांना मोठा झटका दिला आहे.

या बाबत सविस्तर अधिक माहिती अशी की, वर्षं 2012 मध्ये देगलूर येथील प्रसिद्ध व्यापारी तथा शेतीनिष्ठ शेतकरी शेख अयुब यांच्या विरोधात साप्ताहिक सार्वभौम जनता आणि दैनिक श्रमिक एकजूट या वर्तमानपत्रात एका जमिनींच्या प्रकरणातून भुमाफिया,हरामखोर अशी विशेषणे लावून बदनामी कारक बातम्या प्रकाशित केल्या होत्या.त्यामुळे आपली विनाकारण बदनामी करुन वातावरण कलूषित करणाऱ्या साप्ताहिक सार्वभौम जनता चे संपादकं विवेक केरुरकर आणि दैनिक श्रमिक एकजूट चे संपादक कृष्णा शेवडीकर यांच्या विरोधात शेख अयुब यांनी वर्षे 2012मध्ये बिलोलीच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर यांजच्या समक्ष खटला क्रमांक 1/2012 दाखल केली होती. वर्ष 2016 मध्ये न्यायधीश आर .बी.भागवत यांनी दोन्ही बाजूंची साक्षी, पुरावे तपासून याचिकाकर्ता शेख अयुब यांच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्यानं बदनामी निष्कर्ष काढला.त्यसाठी विवेक केरुरकर आणि कृष्णा शेवडीकर यांना तिन लाखांचा दंड ठोठावत शेख अयुब यांच्या विरोधात बातम्या प्रकाशित करण्याबाबत ही पाबंद केले.

बिलोलीच्या वरिष्ठस्तर न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केरुरकर आणि शेवडीकर यांनी बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील क्रमांक 33/2016 दाखल करत आव्हान दिले होते.प्रस्तूत अपीलात दि.3 जानेवारी 2024 रोजी , जिल्हा न्यायाधीश कोठाळीकर यांनी विवेक केरुरकर,शेवडीकर यांची अपील फेटाळून लावत खालच्या कोर्टातील निकाल कायम ठेवत तिन लाख रुपये दंड आणि न्यायालयाचा खर्च केरुरकर आणि शेवडीकर यांनी द्यावा असे आदेशात नमुद केले.

जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शेख अयुब यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर केरुरकर,शेवडीकर यांना मोठी चपराक बसली आहे.

संपुर्ण प्रकरणात शेख अयुब शेख अली यांच्या तर्फे एड.एम.एम.बेग यांनी प्रभावी पणे बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *