राम मंदिराच्या उद्‌घाटनाला मी ही जाणार आहे; ज्यांना जावे वाटते त्या सर्वांनी तेथे जावे-ना.रामदास आठवले

नांदेड(प्रतिनिधी)-22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण मला आले आहे मी माझे माणसे तेथे जाणार आहोत. ज्या-ज्या लोकांना राम मंदिराच्या उद्‌घाटनाला जायचे आहे त्या सर्वांनी अयोध्येला जावे. कॉंग्रेसने राम मंदिराचे निमंत्रण नाकारुन आपल्या पायावरच धोंडा मारुन घेतला आहे अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख ना. रामदास आठवले यांनी आज पत्रकारांसोबत चर्चा केली.
आरपीआयच्या एका कार्यकर्त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी रामदास आठवले नांदेडला आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेत आरपीआयचे विजयदादा सोनवणे, आ.राजेश पवार, प्रणिता देवरे पाटील, धम्मपाल धुताडे, शिवाजी भालेराव, बी.एम.दाभाडे, मिलिंद शिराढोणकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना ना.आठवले म्हणाले, मी आणि माझी माणसे राम मंदिराच्या उद्‌घाटनाला जाणार आहोत. सोनिया गांधी, मल्लीकार्जुन खरगे, अधिररंजन चौधरी आदी विरोधी पक्ष नेत्यांनी राम मंदिराच्या उद्‌घाटन प्रसंगी न जाण्याचा निर्णय घेवून स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे असे सांगितले. राम मंदिराच्या उद्‌घाटन प्रसंगात राजकारण आणून उगीचच त्याला वेगळे वळण दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तो पर्यंत विरोधी पक्षांना केंद्राची सत्ता मिळणे अवघड आहे.इसबार 400 से पार असे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे.म्हणून भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांचीच सरकार केंद्रात पुढे येणार आहे. घोडा आणि मैदान समोरच आहे आणि आम्ही सर्व त्यासाठी तयार आहोत.
मुखेड येथे आरपीआय जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. त्यात आरपीआय कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ऍक्टीव्ह व्हावे. आपल्या शाखा फक्त मर्यादीत न ठेवता इतर जाती-जमातीच्या लोकांना सुध्दा सहभागी करून घ्यावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. संविधान बदलाबाबत बोलतांना ना.आठवले म्हणाले की, कोणाचाही बाप संविधान बदलू शकत नाही.
ज्या ठिकाणी बीजेपीची सत्ता येते त्या ठिकाणच्या ईव्हीएममध्ये समस्या असते इतर ठिकाणी त्याच ईव्हीएममध्ये मतदान होते. दुसरी सरकार आली तर त्यात काही समस्या नाही. राहुल गांधींनी काढलेली भारत जोडा यात्रा ही भारत जोडा यात्रा नसुन भारत तोडो यात्रा असल्याचा उल्लेख ना.आठवले यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांना सन्मानाची वागणूक यावर बोलतांना ना.आठवले म्हणाले आमचाही निळा झेंडा सरकारच्या कार्यक्रमात दिसत नाही. याबद्दल चर्चा झाली असून पुढे होणार नाही असे मला वाटते. लोकसभा निवडणुकीत आरपीआय पक्षाला शिर्डी आणि पंढरपूर या दोन जागा देण्यात याव्यात अशी माझी मागणी आहे.
दोन दिवसांपुर्वी मुदखेड तालुक्यातील घडलेेल्या प्रकाराबद्दल बोलतांना ना.आठवले म्हणाले की, घटना मानवतेला कलंकित करणारी आहे. अशा लोकांना फाशीची शिक्षा व्हावी. या घटनेबद्दल मी नांदेडच्या पोलीस अधिक्षकांची बोलणार आहे.
जरांगे पाटलांच्या आंदोलनाला माझा सुध्दा पाठींबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते देण्यात यावे.ओबीसी आरक्षणात सर्वच ओबीसींना आरक्षण मिळत नाही. कारण त्यासोबत त्यांना क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे असेच मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर तामिळनाडू राज्याप्रमाणे ओबीसी या आरक्षण संवर्गात असणारे दोन वेगवेगळे गट तयार करावेत. त्यातही ज्या मराठ्याचे उत्पन्न वार्षिक 8 लाखांपर्यंत आहे त्यांनाच ते आरक्षण मिळेल असे ना.आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *