काही वकील मंडळींचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध-ऍड.गौतम किणीकर

न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि वाचनालयास नाव यानंतर समोर आला हा विरोध
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत असलेले राजकारण वास्तव न्युज लाईव्हने नवीन इमारतीच्या शिलालेखावर नाव येण्यासाठी आहे असे वृत्त प्रसिध्द केले होते. परंतू आज चाललेल्या स्वाक्षरी मोहिमेनंतर यातील खरे गमक लक्षात आले आहे. विशेष म्हणजे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, पहिले कायदा मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध दिसलाचा आरोप ऍड.गौतम किणीकर यांनी केला आहे.
नांदेड अभिवक्ता संघाची निवडणुक आताच पार पडली. त्यात अध्यक्ष पदावर ऍड.आशिष गोधमगावकर हे विराजमान झाले. त्यांच्या पॅनलचे बहुसंख्य पदाधिकारी निवडूण आले आहेत. निवडणुकांविषयी बातमी लिहितांना या अभिवक्ता संघाच्या यंदाच्या निवडणुकीत चाललेल्या विविध खेळ्या हा अत्यंत दुर्देवी प्रकार असल्याचे अनेक ज्येष्ठ वकीलांनी चर्चेत आणले होते. तसेच काही दिवसात नवीन न्यायालय इमारतीचे उद्‌घाटन होईल. त्या इमारतीच्या शिलालेखावर आपले नाव कोरले जावे हा उद्देश असल्याचे वृत्त वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केले होते.
आज ऍड.गौतम किणीकर आणि त्यांच्या मित्र वकील मंडळींनी एक निवेदन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांना दिले आहे. त्यात नवीन इमारतीच्या परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि इमारतीतील वाचनालयास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे असे हे निवेदन आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीय नागेश न्हावकर यांनी हे निवेदन स्विकारून या संदर्भाचा प्रस्ताव मी उच्च न्यायालयाकडे पाठवेल. धोरणात्मक निर्णय तेथेच होता असे शिष्टमंडळाला सांगितले.
यानंतर ऍड.किणीकर यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, माझ्या निवेदनावर जवळपास 250 वकीलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पण किणीकर यांनी खेद व्यक्त केला की, नांदेड जिल्हा अभिवक्ता संघात 1800 पेक्षा जास्त सदस्य आहेत. आताच झालेल्या निवडणूकीत 1500 पेक्षा जास्त लोकांनी मतदान केले होते. परंतू डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा प्रस्ताव आणि वाचनालयाचे नाव या निवेदनावर मी स्वाक्षऱ्यांची मोहिम चालवत असतांना मला असे जाणवले की, काही वकील मंडळींचा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध आहे.
नांदेड जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत तीन वाचनालय प्रस्तावित आहेत. त्यात तळ मजल्यावर एक, पहिल्या मजल्यावर एक आणि एक ई लॉयब्ररी प्रस्तावित आहे. काही वकील मंडळींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नको आहे याचे काय कारण याचा शोध घ्यावा लागेल. त्या नवीन इमारतीत तीन वाचनालय होणार आहेत. भारत देश आहे महामानवांच्या विचारांनेच चालतो. किणीकर सांगत होते की, एका वाचनालयास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे आणि इतर दोन वाचनालयाला भारतातील कोणत्याही महापुरूषांचे नाव दिले तर आम्हाला त्याबद्दल काही विरोध नाही.
महामानवांच्या नावासाठी सुध्दा न्यायालय परिसरात सुरू असलेला खेळ अत्यंत दुर्देवी आहे. ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात गुणवंत विद्यार्थी असे संबोधन दिले. काही दिवसांपुर्वीच सुर्याजवळ दिसणाऱ्या एका ताऱ्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्यायालय परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहिण्यास सुरूवात केली तर आम्हाला जागा कमी पडेल. पण नांदेड न्यायालय परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला दिसणारा विरोध दुर्देवी आहे.

संबंधीत व्हिडीओ..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *