नांदेड(प्रतिनिधी)-दशमपातशाह श्री.गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्व (जयंती) सोहळ्याला उत्साहात सुरूवात झाली. वृत्तलिहिपर्यंत नांदेड शहरातून श्री.गुरू गं्रथ साहिबजी यांच्यासह किर्तन सुरू होते.
आज दशमपातशाह श्री.गुरू गोविंदसिंघजी महाराज यांचा प्रकाशपर्व सोहळा साजरा करतांना काल रात्रीपासूनच सचखंड श्री.हजूर साहिब दिव्यांच्या माळांनी उजळून निघाले होते. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी लंगरद्वारे सेवा करण्यात आली. आज सकाळी 5 वाजल्यापासून सचखंड श्री.हजुर साहिब येथे दर्शनासाठी रिघ लागली होती. देश-विदेशातून भक्तमंडळी आलीच आहे. पण नांदेड येथील सिख बांधवांसोबत इतरांनी सुध्दा गुरू महाराजांपुढे आपले डोके टेकवून आशिर्वाद मागितले. दुपारी मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि सर्व पंचप्यारे साहिबान यांनी अरदास(प्रार्थना) करून सचखंड श्री हजुर साहिब येथून नगर किर्तनाला सुरूवात झाली. हे नगर किर्तन गुरुद्वारा चौरस्ता, वजिराबाद चौरस्ता, गांधी पुतळा या मार्गाने परत सचखंड श्री हजुर साहिब येथे दरवर्षी जात असते. वृत्तलिहिपर्यंत नगरकिर्तन सुरूच होते.
