नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. १७ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या स्वागत कक्षामध्ये श्री गुरु गोबिंदसिंघजी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी गुरु गोबिंदसिंघजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानिमित्त गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लडूसिंघ महाजन, स. इंद्रजीतसिंघ, संधू, स. गुरुबचनसिंघ, स. शिलेदार, स. रविंद्रसिंघ मोदी, प्रा. डॉ. परविंदर कौर, महाजन, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के पाटील, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनायक जाधव, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, मेघश्याम सोळंके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, डॉ. विनायक भोसले, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, डॉ. कैलास यादव, परमज्योत रंधावा, सुनिल जाधव यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी गुरु गोबिंदसिंघजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.