नांदेड(प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात आज एका युवकाने काळेश्र्वर कंस्ट्रक्शनचे बिल का काढत नाही म्हणून केलेल्या राड्यात त्याने कार्यालयाचे 25 हजारांचे नुकसान केले. तसेच सहाय्यक अभियंत्याचे कॉलर धरुन त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. वृत्त प्रसिध्द करेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती.
आज दुपारी 4.30 वाजेच्याासुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात घडलेला प्रकार असा आहे की, शशी पाटील नावाचा एक व्यक्ती हाता स्टम्प घेवून कार्यालयात आला आणि सार्वजनिक रित्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना अत्यंत घाणेरड्या शिव्या रेत होता. तेंव्हा सहाय्यक अभियंता ओमप्रकाश गहिणीनाथ काळे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी संजय कांबळे, विक्रम वाठोरे आणि किशन वावरे हे आपल्या कक्षातून बाहेर आले. तेंव्हा शशी पाटील आपल्या हातातला लाकडी स्टम्प घेवून कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांच्या कक्षात घुसत होता. काळे आणि इतर सर्व जण तेथे गेले तेंव्हा शशी पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता अर्धापूर विशाल चोपडे यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमोद कल्याणकर यांच्या काळेश्र्वर कंस्ट्रक्शनचे बिल का काढत नाही म्हणून शिवीगाळ करत होता. दरम्यान त्याने आपल्या हातातील स्टम्पने कार्यालयातील काचा फोडून जवळपास 25 हजार रुपये किंमतीचा शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे अशी माहिती वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झाली. या संदर्भाने पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्याकडे माहिती घेतली असता अद्याप अशा स्वरुपाचा कोणत्यााही गुन्हा दाखल झाला नाही किंवा होणार आहे काय? याबद्दल सुध्दा अनभिज्ञता व्यक्त करण्यात आली.
काळेश्र्वर कंस्ट्रक्शनचे बिल काढण्यासाठी सा.बां.विभागात राडा