नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला विधीसेवा समितीच्यावतीने मिळालेली 5 लाख रुपये रक्कम पैकी 4 लाख 75 हजा रुपये तिच्या अज्ञानाचा फायदा घेवून एका भामट्याने काढून घेतली आहे. उमरी पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला आहे.
उमरी येथील महिला सुष्मिता नारायण आमिलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना विधी सेवा समिती नांदेडच्यावतीने 5 लाख रुपये रक्कम मिळाली होती. त्यांच्या गावातील हरीशचंद्र माधवराव बाऱ्हाळीकर यांनी कोऱ्या धनादेशावर आणि बॅंकेच्या स्लिपवर सह्या घेवून त्यांच्या खात्यातून 4 लाख 75 हजार रुपये काढून घेतले. मला असलेल्या अज्ञानाचा फायदा हरीशचंद्र बाऱ्हाळीकरने घेतला. आता माझ्या खात्यात फक्त 25 हजार रुपये रक्कम शिल्लक राहिली आहे. उमरीचे पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे यांच्या आदेशाने उमरी पोलीसांनी हरीशचंद्र बाऱ्हाळीकर विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 417, 418, 506 प्रमाणे गुन्हा क्रमांक 32/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उनिरिक्षक चेवले यांच्याकडे देण्यात आला आहे.
महिलेच्या बॅंक खात्यातून 4 लाख 75 हजार रुपये गायब