नांदेड(प्रतिनिधी)-आईने आपल्या मुलीविरुध्द आणि जावयाविरुध्द फसवणूक केल्याची तक्रार चौकशी झाल्यानंतर आता गुन्ह्यात बदलली आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी पती-पत्नीविरुध्द गुन्हा दालख केला आहे.
सुमन जगनन्नाथराव फरांदे (75) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सर्व्हे नंबर 23 ब मधील सुमन हाईटस फेज-1 वाडी (बु) येथील दुकान क्रमंाक 9 आणि 10 मधील भिंत पाडून तसेच 22 महिन्यांचा दुकानाचा किराया 2 लाख 97 हजार रुपये आणि 1 लाख रुपये डिपॉझिट घेवून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 11 डिसेंबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान घडली. या बाबत चौकशी झाली. चौकशीनंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका यांनी परवानगी दिल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी सौ.सुमन फरांदेच्या कन्या मेघा राजेंद्र माळी आणि जावई राजेंद्र प्रभाकर माळी या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 नुसार गुन्हा क्रमांक 16/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे हे करणार आहेत.
मुलगी आणि जावयाने केली आईची फसवणूक