नांदेड(प्रतिनिधी)-एमजीएम कॉलेच्या रस्त्यावर रात्री 11 वाजेच्यासुमारास एका युवकाची लुट करून पळालेल्या तिघांना विमानतळ पोलीसांनी 12 तास पुर्ण झाल्यानंतर काही तासात गजाआड केले. सध्या हे तीन दरोडेखोर न्यायालयीन कोठडीत आहेत.
दि.15 जानेवारी रोजी आकाश हनमंत रामशेटवाड हे आपल्या घराच्या कामासाठी विटीची गाडी येणार आहे म्हणून तिला रस्ता दाखवता यावा यासाठी नमस्कार चौकात थांबवले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र अजय टोंग हा पण होता. शतपावली करता करता ते एमजीएम कॉलेज रस्त्यावर चालत असतांना 20 ते 25 वयोगटातील 3 जण दुचाकीवर आले आणि त्यांनी बळजबरी त्यांच्या खिशातला 16 हजार रुपयांचा मोबाईल आणि 100 रुपये दराच्या 5 नोटा असे 500 रुपये घेवून पळून गेले. त्यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी 16 जानेवारी रोजी याबाबत गुन्हा क्रमांक 12/2024 दाखल केला.
सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक नागोराव जाधव, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, पांचाळ, सदाशिव आव्हाड, ज्ञानेश्र्वर भिसे आणि भोसीकर यांनी मेहनत करून घटनेला 12 तास पुर्ण झाल्यानंतर काही वेळातच तीन जणांना अटक केली. त्यांची नावे शशिकांत सखाराम भटगळ (23) रा.कर्मविरनगर नांदेड, संतोष उर्फ मारी परमेश्र्वर तेलंग (26) रा.गुरूनगर नांदेड आणि करण देविदास राठोड (20) रा.बजरंग कॉलनी नांदेड या तिघांना पकडले. त्यांच्याकडून आकाश रामशेटवाडचा मोबाईल अणि 500 रुपये जमा करण्यात आले आहेत. सध्या हे तीन दरोडेखोर न्यायालयीन कोठडीत गेले आहेत.
विमानतळ पोलीसांनी 100 टक्के जप्तीसह तीन दरोडेखोर गजाआड केले