नांदेड(प्रतिनिधी)-एका 6 वर्षीय बालिकेवर अत्यंत कु्ररतेने लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आणि नंतर तिचे प्रेत घरापासून 17 किलो मिटर दुर नेऊन टाकले. या नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 12 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे .
दि.14 जानेवारी रोजी मुदखेड तालुक्यातील एक 6 वर्षीय बालिका गायब झाली. तिचे प्रेत तिच्या घरापासून 17 किलो मिटर दुर 15 जानेवारी रोजी दिसले. बालिकेवर अत्यंत निर्दयीपणे लैंगिक अत्याचार केलेले होते. बालिकेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुदखेड पोलीस ठाणयात गुन्हा क्रमांक 2/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 302, 366(अ), 376, (अ)(ब), 201 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 6 प्रमाणे दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणात पोलीसांनी 86 तासात दोन जण तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्यातील एकाला आज अटक करण्यात आली. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी ताब्यात असलेल्या दोनपैकी दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ (23) रा.मुदखेड तालुक्यात यास न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्त ऍड.रणजित देशमुख यांनी या प्रकरणी पोलीस कोठडीची मागणी करतांना सांगितले की, या प्रकरणातील बरीच तथ्य उघडकीस आणण्यासाठी पोलीस कोठडीची अत्यंत गरज आहे. त्यामध्ये या आरोपीने गुन्हा करतांना परिधान केलेले कपडे जप्त करायचे आहेत, खून कसा केला हे शोधून काढायचे आहे. युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी अल्पवयीन अत्यंत निरागस 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ (27) यास 12 दिवस अर्थात 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.या नराधमासाठी नांदेड येथील कोणत्याही वकिलांनी आपले वकीलपत्र दिलेले नाही.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2024/01/20/मुदखेड-तालुक्यात-अल्पवयी/