मुदखेड तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणारे पापी पोलीसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-14 जानेवारी रोजी मुदखेड तालुक्यातील एका गावातून दुपारी 3 वाजता गायब झालेली सहा वर्षीय बालिका 15 जानेवारी रोजी सकाळी उमरी रस्त्यावर अवर्णनिय अवस्थेत मृत सापडली. नांदेड जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात 86 तास रानोरान फिरून या निरागस बालिकेचे मारेकरी शोधून काढले आहेत.
एक 6 वर्षीय बालिका 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता बेपत्ता झाली. 5 वाजेपासून तिचा शोध सुरू झाला. पण ती सापडली नाही. 15 जानेवारी रोजी सकाळी मुदखेड उमरी रस्त्यावर या बालिकेचा मृतदेह सापडला. या बालिकेवर एवढे अत्याचार करण्यात आले होते की, ते लिहितांना सुध्दा आमची बोटे थरथरत आहेत. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, मुदखेडचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे आदींसह अनेक अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार 72 तास रानोरान फिरले. त्यांनी जेवनाची चिंता केली नाही, आपल्या व्यक्तीगत स्वास्थाची चिंता केली नाही. मिळणाऱ्या एक-एक बाबीला बारकाईने तपासून पुढे-पुढे जात राहिले.
म्हणतात ना कण वाळूचे रगडीता तेलही गळे. अखेर काल दि.19 जानेवारी 2023 रोजी पोलीसांच्या मेहनतीला यश आले. त्यांनी एक 30 वर्षाचा आणि एक 22-24 वर्षाचा असे दोन जण ताब्यात घेतले आहेत. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार ती बालिका यांच्या घराच्या शेजारीच राहत होती आणि त्यांच्या घरात त्या बालिकेचे येणे-जाणे रोजचे होते. त्याप्रमाणेच ति बालिका त्यांच्या घरात गेली आणि या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.पोस्टमार्टम रिपोर्ट सांगते की, बालिकेचा मृत्यू 14 जानेवारीच्या सायंकाळी 7 वाजेदरम्यान झाला असेल. या संदर्भाने पोलीस विभागाकडून अद्याप या बाबीला कोणी दुजोरा देत नाही. पण बालिकेचे मारेकरी पोलीसांच्या ताब्यात आहेत हा घटनाक्रम प्रशंसनिय आहे. या गुन्ह्याचा तपास आता इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्याकडे देण्यात आला आहे.
पालकांनी सुध्दा यानंतर पुढे मुदखेड तालुक्यातील प्रकाराचा अभ्यास केला तर आपले बालक आपल्या नजरे आड होणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज आहे. मुदखेड प्रकरणात आई-वडील कामाला गेले. घरी वयस्कर आजी-आजोबा अशी परिस्थिती होती. आई-वडीलांनी कामाला जावेच लागेल परंतू आमची बालके लहान आहेत म्हणून त्यांच्याबद्दल सुध्दा दक्षतेची गरज आम्हाला घ्यावीच लागेल असे करायला लागेल. हा प्रकार आर्थिक दृष्ट्या जेम-तेम असलेल्या कुटूंबात घडला आहे. श्रीमंत व्यक्तींच्या घरात असे घडू शकते म्हणून आपले अल्पवयीन बालक, बालिका आपल्या नजरे आड जाणार नाहीत याची दक्षता पालकांनाच घ्यावी लागेल. 5 ते 10 मिनिट असे घडले तरी आसपासच्या लोकांना सांगून गावाबाहेर जाणारे रस्ते बंद करायला हवेत आणि प्रत्येक घराची तपासणी गावकऱ्यांनी मिळूनच करावी जेणे करून कमीत कमी अशा घटनांमधील बालिकांचा जिव तरी वाचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *