श्वान पथकातील शेरुने उघड केला गुन्हा
नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथील घडलेली घटना ही काळीमाफासणारीच आहे. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती.यात सर्वात महत्वाचे श्वान पथकाने कामगिरी बजावली आहे. यातील मुख्य आरोपी दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ (23) रा.रोहिपिंपळगाव याला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. या घटनेतील योग्य पध्दतीने तपास करून भक्कम बाजू मांडण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पोलीस अधिक्षक कोकोटे बोलतांना म्हणाले की, या गुन्ह्याचा तपास लावणे कठीण होते. कारण ही घटनाच मानजातीला काळीमा फासणारी होती.यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडे आंदोलने, मोर्चे काढले जात होते. तरीही यांनी सहकार्य केले. यातील आरोपी दशरथ उर्फ धोंडीबा पांचाळ याला पोलीसांनी ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 31 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे. यासाठी पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावकर यांनी घटनास्थळी भेट देवून योग्य ते मार्गदर्शन केले. याच बरोबर अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी ही सर्व यंत्रणा घटनास्थळावर तळ ठोकून होते. यात आरोपीने हा गुन्हा कबुल केला असून यासोबत आणखी कोण-कोण होत याचाही तपास केला जात आहे. सध्या आरोपीकडून मुलीच्या अंगावरील कपडे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी न्यायवैधीक शाळेकडे पाठविण्यात आले आहेत. विशेषता: गावातील सर्व सुजान नागरीकांचे तपासासाठी सहकार्य लाभले. त्यांचेही अभिंनदन.
हा गुन्हा ठरवून केला गेलेला नाही. दारुच्या नशेत करण्यात आला आहे. आरोपी गावातीलच आहे. या अगोदर आरोपीचे कधीही घरी जाणे-येणे नव्हते किंवा त्यांच्या कोणताही वाद नव्हता. केवळ दारुच्या नशेत हा गुन्हा घडला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2024/01/20/अल्पवयीन-बालिकेवर-अत्या-6/