नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यात एका अल्पवयीन निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणारा एकच नव्हता तर दोघे होते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात दुसरा नराधम आज पोलीसांनी अअक केला आहे. हे दोन्ही गुन्हेगार शोधण्यामध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या अधिकारी आणि अंमलदारांसह सर्वात मोठा वाटा श्वान पथकातील शेरु या श्वानाचा आहे.
दि.14 जानेवारी रोजी बेपत्ता झालेली 6 वर्षीय अल्पवयीन बालिका आपल्या घरापासून 17 किलो मिटरअंतरावर मृतअवस्थेत सापडली. तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार लिहिण्याची ताकत वास्तव न्युज लाईव्हमध्ये सुध्दा नाही. पण घडलेला प्रकार अत्यंत भयंकर होता. त्यामुळे सर्वच पोलीस दलाने याला गांभीर्याने घेतले. जेवन, आराम, आरोग्य यांची काही एक चिंता न करता पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वात अनेक अधिकारी, अंमलदार यांनी रात्रंदिवस मेहनत करून 72 तासात पहिला आरोपी अटक केला. त्याचे नाव दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ यास अटक केली. पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी त्याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
या प्रकरणात वास्तव न्युज लाईव्हने काल दोन पापी पोलीसांच्या ताब्यात अशा मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. सायंकाळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ यास अटक केल्याची माहिती दिली. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता काही क्षणांपुर्वी दुसरा पापी माधव दिलीप शिंदे (22) यास सुध्दा अटक करण्यात आली आहे. या दुसऱ्या नराधमाने सुध्दा बालिकेवर लैंगिक अत्याचार केला आहे असा त्यावर आरोप आहे.
या गुन्ह्याची माहिती देतांना अधिकारी आणि अंमलदारांसह पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चार वेळेस श्वान पथकाचे सुध्दा नाव घेतले होते. याचा मागोवा काढल्यानंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार या दोन पाप्यांनी केलेल्या कृत्यानंतर बालिका मृत सापडलेल्या जागेपासून श्वान पथकातील शेरु हा श्वान वारंवार पांचाळच्या घरापर्यंत येवूनच थांबत होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या घरातील विविध वस्तुंना आपल्या चाणाक्ष नजरेने हेरून त्या वस्तु शेरुच्या समोर धरल्यानंतर पुन्हा शेरु या दोघांकडेच जात होता. एकाला काल अटक करण्यात आली. दुसऱ्याचा या नराधम कृत्यात काय सहभाग आहे याचा सविस्तर विचार करून, पुराव्यांची जुळवा-जुळव करून आज दि.21 जानेवारी रोजी बालिकेवर अत्याचार करणारा दुसरा नराधम पोलीस पथकाने अटक केला आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2024/01/20/रोहिपिंपळगाव-येथील-घटना/