94.3 माय एफएमचा पत्रकारितेतील ‘प्राइड ऑफ नांदेड’ पुरस्कार दांडगे यांना प्रदान

नांदेड (प्रतिनिधि)-दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक व मागील २५ वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्य करीत असल्याबद्दल डॉ .अभयकुमार नृसिंहराव दांडगे यांना 94.3 माय एफएम तर्फे पत्रकारितेतील ‘प्राइड ऑफ नांदेड २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हॉटेल तुलसी कम्फर्ट येथे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रजावाणीचे मुख्य संपादक शंतनू डोईफोडे यांचे शुभ हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . व्यासपीठावर याप्रसंगी 94.3 माय एफ एम चे लोखंडे , शशी महामुने ,भाजपाचे प्रवीण साले , बालाजी बच्चेवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .

प्राइड ऑफ नांदेड हा पुरस्कार नांदेड शहराच्या विकासाच्या बाबतीत कार्य करणाऱ्या व्यक्तीस येथील 94.3 माय एफ एम ,युनायटेड बिल्डकॉन अँड डेव्हलपर्स , बजाज गंगोत्री बजाज , पद्मजा मोटर्स , विवान कंपनी लिमिटेड , दैनिक प्रजावाणी व तुलसी कम्फर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो . यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी पत्रकार डॉ अभयकुमार दांडगे यांची निवड करण्यात आली होती .सदर पुरस्काराबद्दल डॉ अभयकुमार दांडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

ज्येष्ठ संपादक कै. सुधाकरराव डोईफोडे यांचा २२ जानेवारी रोजी स्मृतिदिन आहे . या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येवर हा पुरस्कार मिळाल्याने पत्रकार अभयकुमार दांडगे यांनी हा पुरस्कार कै. सुधाकरराव डोईफोडे यांना समर्पित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *