
नांदेड(प्रतिनिधी)-22 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला राममुर्ती प्रतिष्ठापणेचा सोहळा आज सुर्यास्त झाल्यानंतर फटाक्यांच्या आवाजात सुरू आहे. अनेक घरांवर लोकांनी दिव्यांची रोषणाई केली आहे.
आज अयोध्येत शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु रामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा झाली.तेथे तयार करण्यात आलेले भव्य मंदिर एवढे सुंदर आहे की, त्या गर्भगृहात फोटो काढतांना एका चित्रकाराचे डोळे पाण्याने भरून आले. हा क्षण दुसऱ्या छायाचित्रकाराने टिपला अशा या राम भक्तीमय वातावरणात दिवसभर अनेक मंदिरांमध्ये पुजा,अर्चा झाली शहरात अनेक ठिकाणी लोकांनी डी.जे.वाजवे, अनेक ठिकाणी ढोल ताशांचा गजर होता. वेगवेगळ्या पदार्थांचे अन्न वाटप झाले. काही ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रामजी से कह दो मेरा जय सियाराम या भजनाने आसमंत दुमदुमले होते. अनेक ठिकाणी मंदिर प्रतिष्ठापणेचा लाईव्ह सोहळा दाखविण्यात येत होता अशा प्रकारे भक्तीमय वातावरणात नांदेड शहरात उत्साह दिसून आला. विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे तालुकास्तरावर आणि गावपातळीवर सुध्दा राममुर्ती प्रतिष्ठापणेचा आनंद व्यक्त करतांना जवळपास सर्वच मंदिरे फुलांनी सजवली होती. महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते.
21 तारेखाचा सुर्यास्त होताच नांदेड शहरात अनेक ठिकाणी लोकांनी दिवे लावून, आपल्या घरासमोर, प्रतिष्ठाणासमोर दिवे लावून आनंद व्यक्त केला. नांदेड शहरात असंख्य ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाने आनंद व्यक्त केला जात आहे. शहरातील महाविर चौकात पंचवटी हनुमान मंदिरासमोर लोकांनी जवळपास लाखो रुपयांचे फटाके वाजत आहेत. वृत्तलिहिपर्यंत आनंदाचा हा सोहळा सुरूच आहे.

