नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील अनेक विभागातील पदभरतीसाठी राज्य शासनाकडून आयबीबीएस, पीसीएस या कंपन्यांमार्फत सरळ सेवा पद भरत्या होत आहेत. या रद्द करून लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी नांदेड येथील विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.
सध्या राज्यातील विविध विभागाच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने रद्द करून लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, रिक्त पदांची जाहिरात फेबु्रवारी 2024 च्या आगोदर काढण्यात यावी, शिक्षक भरती एकाच टप्यात काढून 67 हजार पदे भरण्यात यावेत, राजस्थान व मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर परिक्षा शुल्क स्मार्ट कार्ड योजना महाराष्ट्रात राबवून विद्यार्थ्यांची होणारी परिक्षा शुल्कमधून आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी. यासह अन्य मागण्या घेवून दि.23 रोज मंगळवारी सकाळी 10 वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती यांनी आक्रोश मोर्चा काढूून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे मागण्या सादर केल्या.