
नांदेड(प्रतिनिधी)-जर्मनी देशात वास्तव्यास असलेल्या अतिरेकी अमृतपालसिंघचा एक साथीदार नांदेड पोलीसांनी पकडल्यानंतर आज जवाल पोलीस ठाणे पंजाब येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या आरोपीचा ताबा घेतल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन-देसरडा यांच्यासमोर हजर करून प्रवास कोठडी मागितली. ती न्यायालयाने दोन दिवसांसाठी मंजुर केली आहे.
दि.14 जानेवारी 2024 रोजी अवनकुमार उर्फ सोनु चिमा (48) या प्रतिष्ठीत व्यक्तीचा खून झाला होता. त्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील एक आरोपी जुगराजसिंघ काबलसिंघ उर्फ युवी (28) यास नांदेड पोलीसांनी माहिती काढून पकडले होते. या बाबत पंजाब पोलीसांना माहिती दिल्यानंतर जावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हरिंदर सिंघ, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक जतिंदरसिंघ, जगजितसिंघ आणि पोलीस अंमलदार गुरप्रितसिंघ असे नांदेडला आले. नांदेड येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, हरजिंदरसिंघ चावला आणि अनेक पोलीस अंमलदारांनी मिळून पकडलेल्या जुगराजसिंघला न्यायालयात हजर केले. कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे प्रवास कोठडी(ट्रान्जीस्ट रिमांड) मागण्यात आला. न्यायाधीश किर्ती जैन देसरडा यांनी जुगराजसिंघला तीन दिवस प्रवास कोठडी मंजुर केली आहे. पंजाब पोलीस पथक त्याला घेवून पुढे पंजाबकडे रवाना होतील.