नांदेड(प्रतिनिधी)-दि.5 जानेवारी रोजी एका माणसाची लुट झाली होती. त्या प्रकरणाचा गुन्हा उशीरा दाखल झाला होता. त्या प्रकरणातील लुटारुला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी 4 दिवस अर्थात 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.5 जानेवारी रोजी रात्री अनिलकुमार दुबे या व्यक्तीला रोखून तीन जणांनी त्याच्याकडून 700 रुपये रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणाचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात उशीरा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणातील जसविंदरसिंघ उर्फ जस्सी स्वरुपसिंघ रामगडीया (42) यास पकडले होते. काल जस्सीला वजिराबाद पोलीसांनी अटक केल्यानंतर आज सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी जस्सीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश किर्ती जैन देसरडा यांनी जस्सीला चार दिवस अर्थात 28 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात भारतसिंघ आणि जय पुर्ण नाव माहित नसलेला असे तीन जण आरोपी आहेत.