
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल, एक चोरीची दुचाकी गाडी असे साहित्य जप्त केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस उपनिरिक्षक विक्रम वाकडे, पोलीस अंमलदार ज्ञानोबा कवठेकर, शेख सत्तार, अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, शिवानंद तेजवंत, श्रीराम दासरे, शिवानंद कानगुले यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 855/2023 आणि गुन्हा क्रमांक 54/2024 या संदर्भाने शेख समीर शेख चॉंद (24) रा.वाजेगाव याला ताब्यात घेवून विचारपुस केल्यानंतर त्याने 49 हजार रुपये किंमतीचे 5 मोबाईल काढून दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेषराव शिंदे हे करीत आहेत.
गुन्हा क्रमांक 54/2024 च्या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीसांनी सुमित संतोष सरोदे (19), अजय उर्फ लड्या भगवान जोगदंड(22), साईनाथ लक्ष्मण सरसमकर(32) सर्व रा.सिडको नांदेड यांच्याकडून एक चोरीची दुचाकी गाडी आणि एक चोरीचा मोबाईल असा 34 हजार 99 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश गायकवाड हे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, इतवार विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले आहे.