नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात पोलीस विभागात जनसंपर्क विभाग असतांना ुसध्दा पत्रकार म्हणून वावरणारा एक व्यक्ती पोलीसांच्या प्रेसनोट वेगवेगळ्या गु्रपवर व्हायरल करतो. पत्रकार असेल तर त्याने बातम्या लिहिणे आवश्यक आहे. फक्त प्रेसनोट व्हायरल करून स्वत:पत्रकार म्हणवता येते हा एक नवीन प्रकार पत्रकारीतेत सुरु झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात, शहरात पत्रकार म्हणून वावरण्याचा छंद अनेकांना आहे. बातमीचे ब्र माहित नसतांना सुध्दा ते पत्रकार झाले आहेत.दिवसभर पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणे, त्यांच्यात आणि नागरीकांमध्ये सुसंवाद जुळवणे हे महत्वाचे काम तो व्यक्ती करतो. या सुसंवाद प्रकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या पध्दती कोणत्या कोणत्या आहेत. याचा उल्लेख आम्हाला लिहिता वेळेस करता येणार नाही. ज्याला ते जाणून घ्यायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असो. प्रत्येकाला आपले जीवन कसे जगायचे हे ठरवायचे अधिकार असतात. पण आम्ही सत्य मांडण्याचे ध्येेय ठेवूनच वास्तव न्युज लाईव्ह सुरू केले आहे. त्यामुळे सत्य मांडल्याशिवाय आम्ही सुध्दा गपचुप राहणार नाहीत. आम्ही अनेक सत्य मांडल्यामुळे आमच्याविरुध्द अनेक खोटे गुन्हे दाखल झाले. तरी सुध्दा आम्ही सत्य मांडणे सोडलेले नाही.
पोलीस विभागाकडून निघालेली कोणतीही प्रेसनोट आपल्या मोबाईल नंबरवरून वेगवेगळ्या व्हाटसऍप गु्रपवर व्हायरल करण्यातच या पत्रकाराचा हातखंडा आहे. त्याला कोणत्या अतिरेक्याने धमकी दिली ज्यामुळे त्याला प्रशासनाने बंदुक सुध्दा दिलेली आहे. बंदुक असून काय होते, बंदुक चालवतांना मनगटात दम असावा लागतो. पण आजपर्यंत त्याला कोणी धमकी दिल्याचीही माहिती उपलब्ध नाही किंवा तसा अभिलेख सुध्दा नाही? तरी पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला बंदुक दिली आहे. त्याच बंदुकीच्या धाकावर तो हवाल्याचा धंदा करतो म्हणे? त्यात काही महाभाग पोलीस सुध्दा सहभागी असतील अशी शंका आहे. या महाभाग पत्रकाराला बंदुक देण्यात आली तेंव्हा त्यावेळी जिल्हाधिकारी कोणते होते याची सुध्दा माहिती नाही. परंतू जिल्हाधिकाऱ्यांना काही तरी खोटे-नाट्य पटवून बंदुका मिळविण्याचा एक प्रकार सुरू झाला आहे. कोठेही गेले तर त्या व्यक्तीच्या कंबरेला बंदुक पाहुन इतरांना भिती वाटतेच. अशी कामे करु घेणारी बरीच मंडळी नांदेडमध्ये आहेत. त्यात काही जणांना पोलीस सुरक्षा रक्षक सुध्दा आहेत.
पोलीस विभागाचा पीआरओ की पत्रकार?