भास्करराव पाटील खतगावकर व बी.आर. कदमचा जामीन अर्ज बिलोली न्यायालयाने फेटाळला

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर आणि बी.आर.कदम यांना बिलोली जिल्हा न्यायाधीश दिनेश कोठाळीकर यांनी एका फसवणूक प्रकरणात अटकपुर्व जामीन नाकारला आहे.
नरसी येथे जय तुळजाभवानी जिनींग व प्रोसेसिंग सहकारी संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे हे आहेत. भास्करराव पाटील खतगावकर आणि बी.आर.कदम हे तुळजाभवानी संस्थेचे पदाधिकारी नसतांना सुध्दा संस्थेची 1 हजार 400 चौरस फुट जागा बीएसएनएल या कंपनीला विकून फसवणूक केली होती. या बाबत रामतिर्थ पोलीसांनी श्रावण पाटील भिलवंडे यांच्या अर्जाची दखल घेतली नाही तेंव्हा श्रावण भिलवंडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय नायगाव येथे आपली बाजू मांडून भास्करराव पाटील खतगावकर आणि बी.आर.कदम विरुध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश मिळवला. त्यानंतर रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला.
सन 1999 या वर्षी झालेल्या या प्रकरणाचे 9 लाख 10 हजार रुपये मोबदला येणे शिल्लक असतांना सन 2022 ते एप्रिल 2023 या दरम्यान भास्करराव पाटील खतगावकर व बी.आर.कदम आणि अन्य दोघांनी कोणतेही पदाधिकारी नसतांना तुळजाभवानी संस्थेच्या लेटरपॅडवर अध्यक्ष व सचिव असल्याचे दाखवले असा आरोप आहे. 4 फेबु्रवारी 2022 रोजी बीएसएनएल अर्थात दुरसंचार निगम सोबत पत्र व्यवहार करून स्वत:च्या लाभासाठी 17 लाख 10 हजारांवर तडजोड केल्याचा आरोपीही एफआयआरमध्ये आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश दिनेश कोठाळीकर यांनी भास्करराव पाटील खतगावकर व बी.आर.कदम यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. भास्करराव पाटील आणि बी.आर. कदम याांच्यावतीने ऍड. कुंचेलीकर यांनी काम पाहिले.
राजकीय स्वप्नाचे काय होईल
मागील काही वर्षांमध्ये राजकारणात भास्करराव पाटील खतगावकर यांनी एक बदल केला असून त्यानुसार त्यांनी आपल्या सुनबाई मिनल खतगावकर यांना राजकारणात पुढे आणण्याचे स्वप्न बाळगले आहे. काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत भास्करराव पाटील खतगाावकर यांच्याविरुध्दच दाखल झालेला गुन्हा जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारणे हा प्रकार सुध्दा राजकीय भविष्यासाठी नक्कीच घातक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *