नांदेड(प्रतिनिधी)-25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ घेण्यात आली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार त्या शपथ सोहळ्यात उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक शामसुंदर टाक यांनी शपथेचे वाचन केले. त्या पाठोपाठ सर्वांनी शपथेचे सामुहिक वाचन केले. याप्रसंगी आर्थिक गुन्हा शाखेचे जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासोबत अनेक पोलीस अधिकाीर आणि पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, मारोती कांबळे, विनोद भंडारे यांनी उत्कृष्टपणे केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ