नांदेड (प्रतिनिधी)-6 फेबु्रवारी 2023 रोजी रात्री श्रीनगर भागात एका युवकाला मारहाण करून दुसऱ्या युवकाने गच्चीवरुन फेकुन दिल्या प्रकरणी त्या युवकाला उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी काही अटींवर जामीन मंजुर केला आहे.
दि.6 फेबु्रवारी 2023 रोजी रात्री राजू लाकडे आणि राधेशाम अग्रवाल यांच्या माहितीनुसार आकाश शंकर पालीमकर यांनी त्यांना मारहाण केली आणि राधेशाम अग्रवालला मध्यरात्रीच्या सुमारासस ईमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकुन दिले.त्यात त्याचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला या प्रकरणात अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. पोलीस तपासात आकाश शंकर पालीमकर आणि त्याच्या एका सहकारी मित्राला गुन्हा क्रमांक 57/2023 मध्ये भाग्यनगर पोलीसांनी अटक केली. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर एका युवकाला अगोदरच जामीन मिळाला होता. आकाशला जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्याने उच्च न्यायालयात नियमित जामीन अर्ज क्रमांक 2039/2023 दाखल करून जामीन मागिेतला. या प्रकरणात उच्च न्यायालयात ऍड.शैलेंद्र गंगाखेडकर यांनी सादरीकरण केले. नांदेड येथील ऍड. अमनपालसिंघ कामठेकर, ऍड.शरबजितसिंघ शाहु आणि ऍड.सुरज मंत्री यांनी त्यांना मदत केली. या प्रकरणात जामीन मंजुर करतांना न्यायालयाने आकाश शंकर पालीमकरवर अशी अट लावली आहे की, न्यायालयाच्या तारखेशिवाय त्याने नांदेड शहरात खटला संपेपर्यंत वास्तव करायचे नाही.