
नांदेड(प्रतिनिधी)-आज प्रजासत्ताक दिनी पोलीस विभागाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चोरी प्रकरणात जप्त झालेले सोन्या-चांदीचे दागिणे, रोख रक्कम, मोटारसायकली, मोठी वाहने आणि मोबाईल असा एकूण 3 कोटी 23 लाख 77 हजार 812 रुपयांचा मुद्देमाल नागरीकांना परत केला आहे.
आज प्रजासत्ताक दिन समारोह संपल्यानंतर पोलीस मुख्यालयातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, माजी आ.अमर राजूरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोेकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.महेश वडदकर, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप आणि सौ.स्नेहल कोकाटे यांच्या उपस्थितीत विविध गुन्ह्यांच्या अंतर्गत जप्त केलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 97 लाख 58 हजार 112 रुपयांचा मुद्देमाल तसेच वेगवेगळी वाहने असा एकूण 2 कोटी 25 लाख 19 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल, सायबर सेलने जप्त केलेले 128 मोबाईल किंमत 21 लाख 31 हजार 95 रुपये असा एकूण 3 कोटी 23 लाख 77 हजार 812 रुपयांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून नागरीकांना परत करण्यात आला.
ही कार्यवाही डॉ.शशिकांत महावरकर, श्रीकृष्ण कोकाटे, अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.तुगावे, आरसेवार, मिटके, पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कदम, पवार, पोलीस उपनिरिक्षक कागणे, बेरळीकर, महिला पोलीस सुप्रिया टोम्पे, संगिता श्रीमंगले, राठोड आणि वंजारे यांनी पुर्ण केली.
