शेअरमार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावावर 16 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-शेअर मार्केटमधून 10 ते 12 टक्के नफा मिळवून देतो म्हणून पंजाब येथील एकाने 15 लाख 91 हजार 760 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या गुन्ह्याचा तपास इतवाराचे सर्वात महत्वपुर्ण पोलीस उपनिरिक्षक एन.बी.कुंडगिर यांच्याकडे देण्यात आला आहे.
इमरान महम्मद सुलतान खान रा.देगलूरनाका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 सप्टेंबर 2022 ते 10 जून 2023 दरम्यान देगलूर नाका येथे पोलीस चौकीसमोर असलेल्या खय्युम कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला. इमरान खानला कुलदिपसिंघ रा.भटींड्डा(पंजाब) ह.मु.बिकानेर (राजस्थान) याने शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला 10 ते 12 टक्के नफा मिळवून देतो म्हणून इमरान खानकडून 7 लाख 13 हजार 400 रुपये गुंतवणूक करुन घेतली. त्यात नफा जोडला तर नफा 8 लाख 78 हजार 360 रुपये होतो अशी एकूण 15 लाख 91 हजार 760 रुपयांची फसवणुक झाली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून इतवारा येथील सर्वात महत्वाचे फौजदार एन.बी.कुंडगिर यांच्याकडे तपास दिला आहे. सर्व साधारणपणे 15 लाखांपेक्षा जास्तची फसवणूक असेल तर तो गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हा शाखेकडे दिला जात असतो अशी प्रथा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *