27 नवीन पोलीस उपअधिक्षकांना उपविभागांवर नियुक्ती; प्रतिक्षेतील चार अधिकाऱ्यांना नियुक्ती, 15 अजून प्रतिक्षेत

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात 27 पोलीस उपअधिक्षकांनी आपला परिविक्षाधिन कालावधी पुर्ण केल्यानंतर त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. ज्यांच्या जागी यांना पाठविण्यात आले आहे. त्यातील 15 जणांच्या नियुक्त्यानंतर जाहीर होणार आहेत असे आदेश गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश माधव भट यांनी जारी केले आहेत.तसेच मागे पदोन्नती प्राप्त झालेले काही अपर पोलीस अधिक्षक प्रतिक्षेत होते. त्यांनाही नवीन नियुक्ती देण्यात आली आहे. त्यात नांदेड येथून प्रतिक्षेत राहिलेले सुरज गुरव यांना पहिले नाशिक आणि आता मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्यातील परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रम-7 पुर्ण केलेल्या 27 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. संदेश तारसिंग नाईक-उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा जिल्हा गडचिरोली, चैतन्य वसंतराव कदम-उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली जि.गडचिरोली, अरुण बाळासो पाटील-सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर, अप्पासो बबन पवार-उपविभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी जि.कोल्हापूर, विशाल सुरेश क्षीरसागर-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर, सतिश संजयराव कुलकर्णी-उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर, रविंद्र दिनकर भोसले-उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा जि.गडचिरोली, विपुल विजय पाटील-उपविभागीय पोलीस अधिकारी विटा जि.सांगली, राहुल रामचंद्र झालटे-उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर जि.पालघर, विशाल अर्जुन नागरगोजे- पोलीस उपअधिक्षक (अभियान) गडचिरोली, अमर मानसिंग मोहिते-उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड जि.गडचिरोली, रोहिणी ज्ञानेदेव बानकर-उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया शहर, सुरज विठ्ठल जगताप-उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली, श्वेता विष्णु खाडे-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर, मनिषा विश्र्वांभर कदम-उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगावराजा जि.बुलढाणा, दिनेश किशन बैसाने-उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ, अंकिता कैलास कणसे-उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु जि.पालघर, गितांजली कुमार दुधाणे-सहाय्यक पोलीस आयुक्त मिराभाईंदर वसई-विरार, अजय विलास कोकाटे-उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा जि.गडचिरोली, समाधान माधवराव पाटील-उपविभागीय पोलीस अधिकारी पुर्णा जि.परभणी, विवेक हरीदास पाटील-उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी जि.गोंदिया, विनायक बाजीराव कोते-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिरिष बाबासाहेब वमणे-उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा जि.गडचिरोली, योगेश चंद्रकांत रांजणकर-उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी जि.गडचिरोली, सविता मारोती गर्जे-उपविभागीय पोलीस अधिकारी पाटन जि.सातारा, प्राची विनायक कर्णे-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, पुजा संजय नांगरे-उपविभागीय पोलीस अधिकारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण.
या बदल्यांमध्ये प्रतिक्षेत असलेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. सुहास त्र्यंबक शिंदे, सुभाष रमेश दुधगावकर, साईल उमाकांत झरकर, पद्मावती शिवाजी कदम, निता अशोक पाडवी, सुदर्शन साईदास राठोड, नितीन भागवत गणपुरे, संजय गंगाराम पुजलवार, संजीव बालकृष्ण पिंपळे, सुजितकुमार अण्णा क्षीरसागर, ब्रम्हदेव वासुदेव गावडे, संकेत नथुराम देवळेकर, बाबूराव बिरा दडस, विवेक एकनाथ लावंड, जयदत्त बबन भवर असे आहेत.
यासोबत नांदेड येथून बदलून गेलेले पोलीस उपअधिक्षक सुरज पांडूरंग गुरव यांना पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक येथे नियुक्ती देण्यात आली होती पण आता ती बदलून त्यांना पोलीस अधिक्षक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. सोबतच प्रशांत रामेश्र्वर स्वामी यांना पोलीस उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर अशी नियुक्ती देण्यात आली आहे, गणेश सोनाजीराव बिरादार यांना पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक येथे नियुक्ती दिली आहे. विनायक सुखदेव नरळे यांना कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.मुंबई येथे नियुक्ती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *