कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केले राजपत्र

नांदेड(प्रतिनिधी)-मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भाचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला असून त्या संदर्भाचे राजपत्र जारी केले आहे. परंतू यामध्ये हा मसुदा 16 फेबु्रवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल असे लिहिले आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासर्व व मागास प्रवर्ग(जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम 2000 मध्ये सुधारणा करून त्याला आता सुधारणा नियम 2024 असे म्हणावे असे नमुद केले आहे. हा मसुदा 16 फेबु्रवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. या मसुद्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सुचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे आल्यानंतर शासन त्याचा विचार करणार आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासर्व व मागास प्रवर्ग र्(जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम 2012 च्या नियम 2 व्याख्यामधील उप कलम (1) मधील खंड (ज)नंतर पुढील बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा आणि त्या पुर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पुर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. ज्यामध्ये सजातीय विवाहतून जे नातेसंबंध तयार झाले आहेत. त्यांचा समावेश असेल. हा भाग अधिनियमाच्या (ज) (1) अशा स्वरुपात जोडण्यात आला आहे. नियम 5 मधील उपकलम 6 मध्ये सुध्दा काही भाग जोडण्यात आला आहे. यानुसार कुणबी नोंदी मिळालेल्या नागरीकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील अशा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगे-सोयरे ते नातेवाईक अथवा सगे सोयरे आहेत असे शपथपत्र अर्जदाराने पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यानंतर गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ तपासणी करून देण्यात येईल. याच राजपत्रात अर्जदाराकडून पुरवण्यात यायच्या माहितीमध्ये नियम 16 ज क्रमांकाचा मसुदा जोडण्यात आला आहे. त्यानुसार उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधामधील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडीलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे असा या राजपत्राचा एकूण मसुदा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *