नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे अर्धापूर येथील पोलीस अंमलदार संतोष सुर्यवंशी यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संतोष सुर्यवंशी यांना आज ऱ्हदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण दुर्देवाने रुग्णालयात पोहचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सांगण्यात आली. संतोष सुर्यवंशी हे एक उत्तम व्यक्तीमत्व म्हणून त्यांची पोलीस दलात ख्याती होती. त्यांच्या निधनाने पोलीस विभागावर दु:खाची छाया पसरली. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा सुर्यवंशी कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आाहे.
पोलीस अंमलदार संतोष सुर्यवंशी यांचे निधन